NEET पेपरफुटीवर राज ठाकरे आक्रमक; ‘सर्व पेपर कोचिंग क्लासेसमधूनच फुटले’

0

देशभरात चर्चेत असलेल्या NEET परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि कोचिंग क्लासेसवर जोरदार टीका केली आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी NEET चे पेपर कोचिंग क्लासेसमधूनच फुटले असल्याचा आरोप करत शिक्षण क्षेत्रात मोठा व्यावसायिक गैरप्रकार सुरू असल्याचे म्हटले.

राज ठाकरे म्हणाले, “कॉलेजची फी अवघी 20 हजार रुपये आणि कोचिंग क्लासची फी 1 लाख रुपये आहे. एवढी मोठी तफावत असताना विद्यार्थी संतप्त होणार नाहीत तर काय करणार?” शिक्षणाचे व्यापारीकरण होत असून सरकारने कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी इतर बाबींमध्ये वेळ घालवू नये, असा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

NEET परीक्षेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, अनेक वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा संताप रस्त्यावर उतरला आहे. विद्यार्थ्यांवरील कारवाई पाहून प्रत्येक पालकाला आपल्या मुलालाच मारहाण झाल्याची भावना निर्माण झाली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलन ही केवळ सुरुवात असून हा असंतोष पुढे आणखी वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले.

नाशिक आणि कुंभमेळ्यावरही टीका

यावेळी त्यांनी नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरूनही सरकारवर टीका केली. 2015 मधील कुंभमेळ्याच्या कामांचा उल्लेख करत त्यांनी त्या काळात विकासकामे नियोजनबद्ध झाल्याचा दावा केला. मात्र, सध्या नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, झाडांची तोड आणि बाहेरील कंत्राटदारांना दिली जाणारी कामे यावरून त्यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Leave A Reply

Your email address will not be published.