जय भगवान तिरंगा वृद्धाश्रमाला नानजीभाई ठक्कर यांची सदिच्छा भेट

0

ज्येष्ठांसमवेत सत्संग, व्यसनमुक्त जीवनाचा दिला संदेश
दानशूर श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर (ठाणावाला) यांनी राजकोट जिल्ह्यातील गोंडल तालुक्यातील चरखडी गाव येथील जय भगवान” तिरंगा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट देत तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आश्रमाचे संचालक श्री. रसिकभाई आणि श्री. जगदीशभाई यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दानशूर श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर आणि श्री. अर्जुनभाई गोहेल यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
सध्या तिरंगा वृद्धाश्रमात सुमारे २१० ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. ज्येष्ठांसमवेत आयोजित सत्संगादरम्यान नानजीभाई ठक्कर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठाने कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये आणि नेहमी सकारात्मक विचारांनी जीवन जगावे.”

या प्रसंगी अहमदाबादहून आलेल्या भाविकांसोबतही सत्संगाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी नानजीभाई ठक्कर म्हणाले, “मी संपूर्ण भारतभर प्रवास करतो; मात्र इतके प्रेमळ, सेवाभावी आणि आत्मीयतेचे वातावरण इतरत्र क्वचितच अनुभवायला मिळते.”
धनलक्ष्मीबेन नानजीभाई यांच्या सहकार्याने वृद्धाश्रमाला दोन लाख अकरा हजार रुपये किमतीचे पोळी (रोटी) बनविण्याचे मशीन भेट देण्यात आले. या यंत्रामुळे आश्रमाच्या दैनंदिन कामकाजात मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना नानजीभाई ठक्कर यांनी आश्रमात राहण्यामागील कारण विचारले असता अनेक ज्येष्ठांनी सांगितले, “येथे आम्हाला घरापेक्षाही अधिक प्रेम, सन्मान आणि आनंद मिळतो.”
श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर (एन.के.टी.) यांच्या वतीने आश्रमातील ज्येष्ठांना “जय भगवान” लिहिण्यासाठी वह्यांचे वितरण करण्यात आले. तसेच आश्रमातील दहा गरजू ज्येष्ठांना मूळव्याध (हर्स) उपचारासाठी औषधांचेही वाटप करण्यात आले.

तिरंगा वृद्धाश्रम भेटीनंतर वीरपूर येथील श्री जालाराम मंदिरात दर्शन

या भेटीदरम्यान श्री. अर्जुनभाई गोहेल यांनी सांगितले की, तिरंगा वृद्धाश्रम हा वीरपूरपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे. वृद्धाश्रम भेटीनंतर सर्व मान्यवरांनी वीरपूर येथील श्री जालाराम मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.
त्यानंतर सर्वांनी मंदिराच्या अन्नक्षेत्रात महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिराचे पुजारी श्री. महेशभाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाप्रसादाची व्यवस्था केली.
सेवा, सत्संग, सन्मान आणि मानवतेचा संदेश देणारा हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला

Leave A Reply

Your email address will not be published.