नशिराबादजवळ मृत्यूचा थरार! सोयाबीनचा ट्रक अन् राखेच्या डंपरची धडक; चालकाचा अंत

0

जळगाव । नशिराबादजवळील राष्ट्रीय महामार्गावरील मकरा फटाक्यांसमोर वाजेच्या सुमारास जळगावकडे गुरुवारी रात्री १० भुसावळकडून येणारा राखेचा डंपर आणि गुजरातकडून नागपूरकडे जाणाऱ्या सोयाबीनच्या ट्रकमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ट्रकचालक रमेश चंद्र यादव (क्य ५६, रा. उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला, तर डंपरचालक मुक्तचर अली (रा. मध्य प्रदेश) गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे महामार्गावर सुमारे ३ तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.

गुजरातहून नागपूरकडे सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक (क्रमांकएमएच ४० बीजी ६२८७) चालक रमेश चंद्र यादव चालवत होते. रात्री १० वाजे च्या सुमारास मकरा फटाक्यांसमोर दीपनगर येथून जळगावकडे जाणाऱ्या राखेच्या डंपरची (क्रमांक एमएच १५ जीडब्ल्यू ३८७९) व ट्रकची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि ट्रकचालक रमेश यादव केबिनमध्येच अडकून पडले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक सतीश बेलसरे, त्यांचे सहकारी व ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. अखेर क्रेनच्या साहाय्याने ट्रक हलवून तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रमेश यादव यांना बाहेर काढून जीएमसीत हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अपघातात डंपरचालक मुक्तचर अली यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.