दानशूर समाजसेवक नानजी खिमजी ठक्कर ह्यांचे भोपाळ (म प्र.) विमानतळावर जंगी स्वागत
मानवतेचे महान पुजारी आणि ठाण्याचे महा दानशूर व्यक्तिमत्व (एन. के. टी.) चे सर्वेसर्वा अर्थातच नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. यांचे तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्यासोबत मध्यप्रदेश च्या भोपाळ विमानतळावर मोठ्या उत्साहाच्या वातावरणा मध्ये धुम धडाक्यात जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी अयोध्या मंदिर येथील पिठाधीश्वर जगनजेय महाराज ह्यांची आवर्जून उपस्थिती लाभली. या वेळेस पुष्प गुच्छांचा वर्षाव, नव चैतन्याचे उत्साह वर्धक वातावरण आणि मानवतेच्या सामाजिक बांधिलकीचे,जनतेच्या आशा आकांक्षांनी बहरलेले वातावरण नानजी भाईंच्या आगमनामुळे विमानतळा च्या परिसराला प्राप्त झाले होते. नंतर नानजीभाईं च्या अखिल भारतीय गुजरात समाजाच्या सत्कारानंतर भव्य दिव्य सभेला त्यांनी संबोधित केले. यावेळेस अयोध्या येथील राम मंदिराची पीठाधीश्वर जगनजेय महाराज यांनी राम जानकी, या विषयावर मार्गदर्शन करताना असेच समाजाने एकीचे दर्शन घडवलं तरच सामाजिक, धार्मिक विकास साध्य करता येईल या शब्दात त्यांनी प्रतिपादन केले.


डॉ. विश्वासराव आरोटे यांनी गुजरात समाजाचा गौरव करताना शेठ नानजी भाईं चा विशेष उल्लेख करून सांगितले कि नानजीभाई महाराष्ट्रात राहून भारताच्या कान्या कोपऱ्यात लाखो विद्यार्थ्यांचे जीवन घडवित आहेत आणि पुढेही घडवणार. आपल्या भोपाल मध्ये सुद्धा त्यांनी गोशाळा, शाळा व मंदिर उभारणीचा संकल्प जाहीर केला.यांच्या स्वभावातून आणि वर्तणुकीतून परमेश्वराचा निवास, प्रेम वाटत असल्याचे सिद्ध होते. या कार्यक्रमाला भरपूर दिग्गजानी हजेरी लावलेली असून मुंबई हून मंत्रालय पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि लोकशाहीचे संपादक कमलाकर वाणी साहेब आणि चित्रपट निर्माता,लेखक,दिग्दर्शक विशाल वाघ मुंबई.यांनी मुंबईहून शुभेच्छांचा संदेश व्यक्त केला.