मराठी चित्रपट महामंडळ, अंधेरी शाखेत रंगले कलावंत भवितव्याचे चर्चा सत्र

0

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले साहेब ह्यांच्या अध्यक्ष निवडी नंतर, कलावंत प्रगती साठी तसेच निर्माता, निर्देशक ह्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी महामंडळ खूप उत्साहाच्या ताकदीने कामाला लागले आहे ह्यात शंकाच नाही. सहकार्याध्यक्ष दीपक जी कदम साहेब आणि उपस्थित निर्माता तसेच दिग्दर्शक ह्यांच्या विचारांची आज चर्चा सत्रा द्वारे देवाण घेवाण करण्यात आली .

यावेळेस निवडणुकीतून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून सभासदांनी केलेली निवड हि लाजवाब, बेमिसाल असल्याचे बोलल्या जात होते. आणि सर्व निर्माता, लेखक, गीतकार,दिग्दर्शक किंवा फिल्म इंडस्ट्रिशी निगडित सर्वच कॅटेगिरी तील कलवंतांनी दोन पावलं जिद्दीने चालावे, बाकीचे दोन पावलं चालवण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. ह्या शब्दात दीपक कदम साहेब ह्यांनी अध्यक्षांच्या वतीने निर्माता,दिग्दर्शकांचे मनोबल उंच केले. या वेळेस निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, वाघ साहेब ह्यांनी उपस्थित प्रतिष्ठितां सोबत सहकार्य प्रमुख आदरणीय दीपक कदम साहेब ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या बहारदार चर्चासत्रा वेळेस निर्माती आदरणीय रूपाली जैन मॅडम, सौ. सुगंधी विवेक आणि महा मंडळ ऑफिस चे सर्वेसर्वा श्री विशाल पवार सर आणि हेमंत पवार तसेच अंकिता आणि सह निर्माता प्रदीप जाधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.