केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सूपूर्द केला आहे.

नीट पेपरफुटीनंतर सीजेपी (CJP) च्या नेतृत्वाखाली विद्यार्थी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत एका महिन्याहून अधिक काळापासून निदर्शने करत होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या मुद्द्यावर २६ दिवस उपोषण केले होते. त्यानंतर अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.


दरम्यान, या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.