उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयाच्या अपॉइंटमेंट वेळेत बदल

0

सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत नवीन वेळ लागू

जळगाव,-: जळगाव जिल्ह्यात सध्या वाढत्या तापमानामुळे उष्णाघाताच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयात योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, कच्ची व पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स) चाचणी आदी कामांसाठी येणाऱ्या वाहनमालक, चालक व अनुज्ञप्तीधारकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यालयाच्या अपॉइंटमेंट वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयातील पूर्वीच्या अपॉइंटमेंट वेळेत बदल करून नवीन वेळ सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. ही वेळ तात्पुरत्या स्वरूपात लागू राहणार आहे.

तसेच सर्व नागरिक, वाहनधारक व अनुज्ञप्तीधारक यांनी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच कच्ची व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी वरील कालावधीतच अपॉइंटमेंट घेण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जळगाव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.