योगेश वसंत त्रिवेदी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ; रामदास आठवले यांनी केला प्रदान
मुंबई | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले यांचे जनसंपर्क अधिकारी आणि स्टार महाराष्ट्र चे संपादक श्री हेमंत रणपिसे यांनी स्टार महाराष्ट्र साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला होता.

नुकतीच योगेश वसंत त्रिवेदी यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात येऊन तीन स्टेंट बसविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांना साप्ताहिक ‘स्टार महाराष्ट्र’चा प्रतिष्ठित राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला. या प्रसंगी संपादक श्री. हेमंत रणपिसे आणि ज्येष्ठ पत्रकार श्री भारत कदम हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी योगेश त्रिवेदी यांनी श्री. रामदास आठवले यांना पासष्टायन, गुरुजी आणि ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य लिखित आठवणीतले प्रबोधनकार ही पुस्तकेही भेट दिली.

