२० हजारांची लाच; रावेरमध्ये वनरक्षकास अटक

0

रावेर: शेतातील गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीन व ट्रॅक्टरद्वारे गाळ वाहतुकीची परवानगी देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रावेर येथील वनरक्षक जगदीश जगदाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. २८ ऑक्टोबर रोजी अटक केली.

यातील तक्रारदार यांचा व्यवसाय आहे. त्यांनी नातेवाईकांच्या नावे मंगरुळ धरणातून शेतीकामासाठी गाळ वाहतूक करण्याचा परवाना पाटबंधारे विभागाकडून घेतला. मात्र हे ठिकाण जगदाळे याच्या कार्यक्षेत्रात आहे. त्याने तक्रारदाराकडे जेसीबीने गाळ काढण्यासाठी २० हजार, तर ट्रॅक्टरद्वारे वाहतुकीसाठी ३० हजार रुपयांची मागणी केली होती.

तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारताना पथकाने त्यांना पकडले. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.