रेल्वे गेट बंद केल्याने विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागतो रेल्वे ट्रॅक

0

या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा अशी मागणी करूनही रेल्वे प्रशासन करत आहे दुर्लक्ष.

इगतपुरी : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने इगतपुरी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समवेश केला असून यामुळे इगतपुरी रेल्वे स्थानकाचा सर्वतोपरी विकास झाला आहे. मात्र दुसरीकडे इगतपुरी रेल्वे स्थानकापासून अर्धा किलोमीटरवर असलेले पिंप्री गेट रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता १९८० सालापासून बंद केले तेंव्हापासून नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रेल्वे गेटवर उड्डाण पुल व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊन देखील रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक कैलास विश्वकर्मा यांनी दिली आहे. याबाबत ज्येष्ठ नागरीक संघ, विरंगुळा केंद्राचे ज्येष्ठ नागरिक कैलाश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, इगतपुरी शहरातील खालचीपेठ येथे रेल्वे फाटक असुन रेल्वेने २५/३० वर्षापासुन बंद केले असुन त्यास पर्यायी दुसरा रस्ता दिलेला नाही. त्यामूळे रेल्वेने ओव्हर ब्रिज बांधून द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली आहे.

विशेष म्हणजे रेल्वे फाटकाचे दक्षिण बाजुला मुस्लीम धर्मियांचे कब्रिस्तान आहे व रेल्वेच्या उत्तर कडेला हिंदू स्मशान भुमि असल्याने नागरीकांना हिंदु समाजाची अंत्ययात्रा तसेच मुस्लीमांचे जनाजा रेल्वे ट्रॅकवरून घेवून जावे लागत आहे. शेतकरी वर्गास आपली शेती अवजारे, ट्रॅक्टर ट्रॉली शेतावर आणण्यास व नेण्यांस रेल्वेला वळसा घालून ५ की.मी.अंतर फिरुन जावे लागत आहे. यात १०० ते १५० रुपये रिक्षा भाडे दयावे लागते. शाळेतील मुलांना शाळा, कॉलेज, दवाखान्यात येण्याजाण्यासाठी जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅक वरून जावे लागत आहे. तसेच बस स्टंड समोर असलेल्या रेल्वे पाईपलाईन या ठिकाणी भवानी नगर, जुना गांवठा, नवीन गांवठा, रामनगर, राजवाडा, मिलींदनगर, सहयाद्रीनगर, शिवाजीनगर अशा वस्त्या आहेत. तर याच रेल्वे गेटच्या पलीकडे तळोशी, पिंप्री, भावली, बोर्ली, व्यकटेशनगर, नांदगांव आदी गावे आहेत. गेल्या दहा वर्षांपूर्वी या रेल्वे गेटवर खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते उड्डाण पुलाच्या कामाचे भुमिपुजनही करण्यात आले होते. मात्र भुमिपुजन होऊन प्रत्यक्ष कामाला आजपर्यंत सुरुवात झाली नाही.

उड्डाण पूल झाल्यास खालचीपेठ, हॉलीडेहोम, ए.ई.एन.आफिस, मध्य रेल्वे कार्यालय, रेल्वे प्रवाशी तसेच गावातील नागरीक विद्यार्थी व रेल्वे कामगारांना रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी येण्या जाण्यांस मार्ग मोकळा होईल’ शाळा कॉलेज, तसेच कामगारांना येण्या जाण्याची सूविधा होईल. रनिंगरुम, रेल्वे कॉलनी तील लोकांना तसेच रिटायर्ड नागरीकांना, रेल्वे कर्मचा-यांना शिवाजी नगर, सह्याद्री नगर, मिलिंद नगर, पुलिस लाईन, पाण्याची टाकी येथील रहिवाश्यांना पण येण्याजाण्यांची सूविधा मिळेल. या रेल्वे गेटवर त्वरीत उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
— कैलास विश्वकर्मा, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Leave A Reply

Your email address will not be published.