पोलीस पाटील युवराज माळी व ग्रामस्थ यांची तत्परतेमुळे दुचाकी चालक मृत्यूच्या दाढेतून बाहेर
वेळीस उपचारामुळे मिळाले जीवदान
शिंदखेडा | तालुक्यातील भडणे येथे आजही समाजात व गावात निस्वार्थ समाजसेवा व माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व असल्याचा अनुभव भडणे करांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले त्याचा प्रत्येक दिनांक 23 मे रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी शिवशक्ती कृषी सेवा केंद्रावर ऍग्रो स्टार कंपनीचा एजंट गोपिचद सहादू पाटील रा होळ वय 50 हा व्यक्ती कंपनीचा माल देण्यासाठी भर दुपारच्या वेळेस उन्हात आपल्या दुचाकीने प्रवास करून नंदुरबार येथून भडणे येथे शिवशक्ती कृषी सेवा केंद्रावर दुचाकीने आला असता अंगणात उभा असताना भोवळ येऊन खाली पडला यावेळी आजूबाजू जमलेले गावकरी मदतीसाठी सरसावले व गावकरीजमा झाले जमलेले प्रत्येक जणआप आपल्या परीने जोतो
त्या व्यक्तीला हात पाय चोळीत तसेच हवा घालत शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होते गर्दीत जमलेले उदय पाटील ग्रामपंचायत सदस्य गोरख पाटील लालचंद चौधरी भाऊसाहेब पाटील सुरेश पाटील यांनी त्या व्यक्तीला छातीवर स्पंच मारून शुद्धीवर आणले तर काहींनी डॉक्टरला बोलून त्यांना वेळीच उपचार दिला दुपारची उन्हाची वेळ प्रचंड उकाडा अशा परिस्थितीत प्रचंड तापमान यामुळेच चक्कर येऊन खाली पडल्याने या व्यक्तीला वेळीच ग्रामस्थांची तत्परता डॉक्टरांचा उपचार मिळाल्यामुळे तब्येत धोक्यातून बाहेर पडले नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण ही घटना जर रस्त्यावर भर उन्हात घडली असती तर कदाचित मोठा अनर्थ घडू शकला असता यावेळी भडणे येथील राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी होळ येथे संपर्क साधून त्यांची पत्नी पुतण्या गोलूपाटील यांना सदर घटनेची माहिती देऊन आपले पुतण्या यांना बोलावून पुढिल उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले भडणेकरानी दाखवलेली तत्परता व माणुसकी वेळीच मिळालेले उपचार यामुळे गोपिचद पाटील हे मृत्यूच्या दाढेतून बाहेर निघाले एवढे मात्र निश्चित,,,,

