विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर; ‘माविआ’मध्ये मात्र बिघाड

0

मुंबई । राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी होत असलेली निवडणूक आता अत्यंत चुरशीची वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्तेत असलेल्या महायुतीमधील घटक पक्षाने आपले उमेदवार जाहीर केला असताना महाविकास आघाडीत मात्र ‘बिघाडी’ झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शिवसेना ठाकरे गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नाराज असून, काँग्रेसनेही स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे १० जागांसाठी आता ११ उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता निर्माण झाली असून, निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळू शकते.

भाजपचा ‘सिक्सर’ तर शिंदेंची दोन नावांना पसंती
भारतीय जनता पक्षाने आपल्या कोट्यातील ६ उमेदवारांची नावे निश्चित करून निवडणुकीत मोठे वर्चस्व राखण्याचे नियोजन केले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दोन, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एका उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.

पक्षनिहाय जाहीर झालेले अधिकृत उमेदवार:
भाजप (६): प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनील कर्जतकर.
शिवसेना – शिंदे गट (२): बच्चू कडू, नीलम गोऱ्हे.
राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट (१): झिशान सिद्दीकी.
शिवसेना – ठाकरे गट (१): अंबादास दानवे.

मविआत ठिणगी: काँग्रेस स्वतंत्र उमेदवार देण्यावर ठाम
ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आज झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उमेदवारीसाठी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सचिन सावंत, अतुल लोंढे, यशोमती ठाकूर, मोहन जोशी आणि नसीम खान यांच्या नावांवर सखोल चर्चा झाली. ठाकरेंनी काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असला, तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते.

जर काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवला, तर निवडणूक बिनविरोध होणार नाही. अशा परिस्थितीत भाजप किंवा शिंदे सेना आपला एक अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरवून ‘फिल्डिंग’ लावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे संकेतही दिले आहेत. यामुळे १० जागांसाठी ११ उमेदवार झाल्यास मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ किंवा मतांची फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेस उमेदवार देणार? कुणाच्या नावाची चर्चा ?

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधान परिषदेत आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. कुणाला उमेदवारी द्यायची, त्यासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची आज बैठक झाली. त्यामध्ये बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सचिन सावंत, अतुल लोंढे, यशोमती ठाकूर , मोहन जोशी, नसीम खान या सात नावांची जोरदार चर्चा झाली. दुसरीकडे काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न करण्यात आले. पण ही चर्चा व्यर्थ केली. काँग्रेस उमेदवारी देण्यावर ठाम असल्याचे समजतेय.

Leave A Reply

Your email address will not be published.