नांदेडमध्ये माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला, महाराष्ट्रासह देशभरात खळबळ

0

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (SAD) प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेड येथे गुरुद्वारात हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (13 ऑगस्ट) सकाळी घडली.एका निहंग शिख व्यक्तीने कृपाणाने अचानक हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांच्या सुरक्षेतील पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधील एका गुरुद्वारात सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुखबीर सिंह बादल यांच्यावर निहंगाने अचानक कृपाणाने हल्ला केला. त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी निरीक्षक संतोष केंद्रे यांनी बादल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तेही जखमी झाले.हल्ल्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. नांदेड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुखबीर सिंह बादल यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

सुखबीर बादल यांच्यावर हल्ल्याची दुसरी घटना –

सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 4 डिसेंबर 2024 रोजी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात त्यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी गोळी बादल यांना लागली नव्हती.त्या घटनेत नारायण सिंह चौरा याने सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळी झाडली होती. त्यावेळी बादल धार्मिक शिक्षेचा भाग म्हणून सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर ‘सेवादार’ म्हणून सेवा बजावत होते. उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला होता.नारायण सिंह चौरा हा बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित दहशतवादी असल्याचे त्या प्रकरणाच्या वृत्तांत नमूद करण्यात आले होते. 1984 मध्ये तो पाकिस्तानात गेल्याचे सांगितले जाते.

पंजाबमध्ये शस्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करण्यात त्याची भूमिका असल्याचा आरोप आहे. पाकिस्तानमध्ये त्याने गुरिल्ला युद्धपद्धती आणि भारतविरोधी साहित्याशी संबंधित पुस्तक लिहिल्याचेही वृत्त होते.चौरा याचे नाव 2004 मधील बुऱ्ैल जेल ब्रेक प्रकरणाशीही जोडले गेले होते. या प्रकरणात पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या हत्येतील आरोपींसह चार कैदी 94 फूट लांबीचा बोगदा खोदून तुरुंगातून फरार झाले होते. या घटनेतही चौरा याचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता.दरम्यान, नांदेडमधील आजच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.