दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! मध्य रेल्वे चालवणार ४१८ ‘स्पेशल’ ट्रेन्स
मुंबई । दिवाळी आणि छट सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विविध मार्गांवर तब्बल ४१८ उत्सव विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सेवांचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

नवरात्र, दिवाळी आणि छठपूजेसाठी विशेष नियोजन


नवरात्रोत्सवापासून दिवाळी आणि छठपूजेपर्यंत देशभरातील विविध मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. विशेषतः मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे प्रवाशांना वेळेत तिकीट उपलब्ध व्हावे आणि सणाच्या काळातील अतिरिक्त प्रवासी भार हाताळता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.
कन्फर्म तिकीटासाठी प्रवाशांना दिलासा
सणासुदीच्या काळात नियमित गाड्यांचे आरक्षण सुरू होताच अनेक मार्गांवरील तिकिटे वेगाने फुल होतात. त्यामुळे अनेक प्रवाशांना वेटिंग तिकिटावर अवलंबून राहावे लागते. आता ४१८ विशेष गाड्या उपलब्ध झाल्याने प्रवाशांना अतिरिक्त आसनक्षमता मिळणार आहे.
CSMT मुंबई – गोरखपूर – CSMT मुंबई दैनिक विशेष (६४ फेऱ्या)
०१०७९ विशेष दररोज रात्री २२.३० वा. CSMT येथून १६.१०.२०२६ ते १६.११.२०२६ पर्यंत सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वा. गोरखपूरला पोहोचेल. (३२ फेऱ्या)
०१०८० विशेष दररोज दुपारी १४.३० वा. गोरखपूरहून १८.१०.२०२६ ते १८.११.२०२६ पर्यंत सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ००.४० वा. CSMT ला पोहोचेल. (३२ फेऱ्या)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, मनकापूर, बस्ती आणि खलिलाबाद.
CSMT मुंबई – चेन्नई – CSMT मुंबई साप्ताहिक एसी विशेष (१२ फेऱ्या)
– ०१०१५ दर बुधवारी ००.३५ वा. CSMT मधून १४.१० ते १८.११.२०२६, चेन्नई बीचला रात्री २३.३० वा. (६ फेऱ्या)
– ०१०१६ दर गुरुवारी ०४.०० वा. चेन्नई बीचहून १५.१० ते १९.११.२०२६, CSMT ला दुसऱ्या दिवशी ०४.०५ वा. (६ फेऱ्या)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड इत्यादी.
CSMT – बेंगळुरू (SMVB) साप्ताहिक एसी विशेष (१४ फेऱ्या)
– ०१०१३ दर शनिवारी ००.३५ वा. CSMT मधून १०.१० ते २१.११.२०२६
– ०१०१४ दर रविवारी ०४.३० वा. बेंगळुरूहून ११.१० ते २२.११.२०२६
थांबे: पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, धारवाड, हुबळी, दावणगेरे इत्यादी.
CSMT – लातूर – CSMT आठवड्यातून दोन वेळा (२६ फेऱ्या)
– ०११०५ दर मंगळवार/गुरुवार ००.३५ वा. CSMT मधून १३.१० ते २४.११.२०२६, लातूरला ११.४० वा.
– ०११०६ दर मंगळवार/गुरुवार १६.३० वा. लातूरहून, CSMT ला दुसऱ्या दिवशी ०४.१० वा.
CSMT – नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट (१२ फेऱ्या)
– ०२१३९ दर शनिवारी ००.२५ वा. CSMT मधून १७.१० ते २१.११.२०२६
– ०२१४० दर रविवारी १३.३० वा. नागपूरहून १८.१० ते २२.११.२०२६
CSMT – कोल्हापूर साप्ताहिक (१२ फेऱ्या)
– ०१४१७ दर गुरुवारी १४.३० वा. CSMT मधून
– ०१४१८ दर गुरुवारी ००.०५ वा. कोल्हापूरहून
LTT – मऊ – LTT आठवड्यातून दोन वेळा (२४ फेऱ्या)
– ०११२३ दर शुक्रवार/रविवार १२.१५ वा. LTT मधून ११.१० ते २०.११.२०२६
– ०११२४ दर रविवार/मंगळवार ०४.१५ वा. मऊहून
LTT – तिरुवनंतपुरम नॉर्थ साप्ताहिक (१२ फेऱ्या)
– ०१४६३ दर गुरुवारी १६.०० वा. LTT मधून १५.१० ते १९.११.२०२६
– ०१४६४ दर शनिवारी १४.१५ वा. तिरुवनंतपुरमहून
थांबे: पनवेल, रोहा, रत्नागिरी, मडगाव, कारवार, मंगळुरू, कोची, कोट्टायम इत्यादी कोकण मार्गे.
LTT – मडगाव साप्ताहिक (१४ फेऱ्या)* – ०११७९/०११८०
LTT – बनारस आठवड्यातून दोन वेळा (२४ फेऱ्या)* – ०१०५१/०१०५२
पुणे – न्यू अमरावती साप्ताहिक एसी (१२ फेऱ्या)* – ०१४०३/०१४०४
हडपसर – गाझीपूर सिटी आठवड्यातून दोन वेळा (२४ फेऱ्या)* – ०१४३१/०१४३२
हडपसर – गोरखपूर दैनिक (६४ फेऱ्या)* – ०१४१५/०१४१६
नागपूर – हडपसर आठवड्यातून दोन वेळा (२६ फेऱ्या)* – ०१२०१/०१२०२
नागपूर – हडपसर साप्ताहिक (१४ फेऱ्या)* – ०१२०९/०१२१०
कोल्हापूर – कलबुर्गी – कोल्हापूर (शुक्रवार वगळता ५ दिवस) (६४ फेऱ्या)* – ०१४५१/०१४५२