एपीआय भामरे यांच्या संकल्पनेतून पोलीस पाटलांना दिवाळी भेट

0

कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून दिवाळी साजरी करा, एपीआय मयूर भामरे

शिंदखेडा खाकी वर्दीत सामाजिक बांधिलकी जोपासणारे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्याकडून पोलीस पाटलांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू तसेच गोड पदार्थ देऊन दिवाळी गोड करण्यात आली या अभिनव उपक्रमाबद्दल प्रभारी पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांचे पोलीस पाटलांनी अभिनंदन करुण आभार व्यक्त केले

शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदखेडा पोलीस स्टेशन मध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटलांची मासिक मीटिंग नुकतीच पार पडली या बैठकीचे औचित्य साधत शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पुरुष व महिला पोलीस पाटलांना शिंदखेडाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिवाळीनिमित्त भेटवस्तू व गोड स्वीट पदार्थ देऊन दिवाळी गोड साजरी करण्यात आली पोलीस पाटील हे नेहमी पोलीस विभागाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात यामुळेच पोलीस पाटील महसूल व गृह विभागाचा नाक कान डोळे म्हणून समजला जाणारा महत्त्वाचा घटक आहे आपल्या तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या पोलीस पाटील नेहमी गावात 24तास पारदर्शकपणे शासनाची व गावाची बाजु सांभाळून प्रशासनास सहकार्य करणारे पोलीस पाटील नेहमी गावाच्या रोषाला सामोरे जाऊन प्रशासनाला मदत करतात अशा या घटकाला खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्वच पोलीस पाटलांना

एपीआय मयूर भामरे हे कुठलाही सार्वजनिक सण उत्सव पोलीस स्टेशनचा स्टाफ व पोलीस पाटीलाना आपला परिवार समजून आनंदाने साजरा करतात
यातून पोलीस कर्मचारी असो अधिकारी असो पोलीस पाटील अशा या अभिनव उपक्रमाबद्दल भारावून जात धन्यता व्यक्त करतात हेही मात्र तेवढेच खरे या कार्यक्रमात यावेळी सन उत्सव काळात पोलीस पाटील यांनी गावात बारकाईने लक्ष ठेवून एकोपा ठेवा जिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न व निर्माण होत असेल त्याची गोपनीय माहिती कळवा

दिपावली उत्सव काळात बंद घरात बाहेरगावी जाणारे कुटुंब यांनी घरात मौल्यवान वस्तू तसेच रोख रक्कम घरात न ठेवता सुरक्षित स्थळी लाकप मध्ये ठेवा,बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू अंगावर घालू नका ,बाहेरगावी जाताना आपल्या आजूबाजूच्याशेजाऱ्यांना सांगा ,,,,,,
सीसीटीव्ही चालू ठेवा, गावात अनोळखी संशयितव्यक्ती दिसल्यास पोलीस विभागाशी संपर्क ठेवा,
सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने रात्री आळीपाळीने रात्रीची गस्ती घाला ,
शेतातील गुरे ढोरे शेळ्या तसेच शेती अवजारे आपल्या नजरेखाली ठेवा, गावातील अनोळखी व्यक्ती दिसल्यास चौकशी करा याबाबत एपीआय भामरे यांनी पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले यावेळी पोलीस पाटील व महीला पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनंत पवार रवींद्र ईशी फुल पगारे हेमराज जाधव आधी यावेळी उपस्थित होते

कर्तव्यावरची दिवाळी मनाला समाधान देते,,,
आमच्यासाठी दिवाळी म्हणजे सुट्टी नव्हे तर अखंड सेवा आणि जबाबदारीचे पर्व आपले घरदार सोडून केवळ जनसेवेच्या आणि संरक्षणाच्या पवित्र भावनेने कर्तव्यावर तत्पर असतात आमचा प्रत्येक क्षण समाजाच्या सुरक्षितेसाठी समर्पित असतो त्यांची दिवाळी ही शांतता सुव्यवस्था आणि नागरिकांच्या निर्भयतेत सामावलेली असते समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षितेसाठी आपल्या घराच्या आनंदावर तुळशीपत्र ठेऊन कर्तव्य बजावणारे या खाकीतील देवदूत आपल्या कुटुंबापासून दूर असतात त्यांच्या समवेत दीपावली साजरी करणे हाच खरा आनंद
मयूर भामरे प्रभारी पोलीस निरीक्षक शिंदखेडा

Leave A Reply

Your email address will not be published.