कोल्हापूरच्या राणी खंडागळे यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती प्रेरणा पुरस्कार

0

पुणे : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्याबद्दल कोल्हापूर येथील मा. राणी जयराम खंडागळे यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती प्रेरणा पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.पुणे पत्रकार प्रतिष्ठान येथे शांतिदूत परिवार, डॉ. सुरेश डी. एम. राठोड फाउंडेशन, सर्विस बेंच फाउंडेशन, इंडियन पोलिस मित्र भारत आणि विशेष कार्यकारी अधिकारी न्याय हक्क जनजागृती फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे, आयकर आयुक्त शिवकुमार साळुंखे, आयएएस डॉ. मोहन गावंडकर, आयपीएस डॉ. दिनेश वारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी, लोकहिताची जाणीव, समाजप्रबोधन आणि सेवाभावी कार्याची दखल घेत राणी खंडागळे यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी हा सन्मान समाजकार्यात प्रेरणा देणारा असून भविष्यातही अधिक जोमाने समाजहिताची सेवा करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या सन्मानाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी राणी खंडागळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.