राज्यात हवामानात मोठा बदल ; वादळी वारा अन् मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस

0

राज्यातील वाढत्या उष्णतेनंतर आता हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांत पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील काही भागांमध्ये पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज ४ मे रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असून येथे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येथे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. ५ मे रोजीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुधवार, ६ मे रोजी पूर्व विदर्भासह कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.