सुरेखा (यमूबाई) तुकाराम राव यांच्या स्मृतींना अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती

0

स्व. सुरेखा (यमूबाई) तुकाराम राव यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त २१ ऑगस्ट २०२६ रोजी साईबाबा मंदिराजवळ, सारमाळ, वाशीनद येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. यमूबाईंच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या प्रेमळ व आपुलकीच्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाला समाजसेवक नानजीभाई खीमजीभाई ठक्कर ठाणावाला, ह. भ. प. समाधान महाराज शर्मा (केज, जि. बीड) यांच्यासह श्री. रामदास तुकाराम पाटील, श्रीमती सुमित्रा रामदास राव, श्री. दत्ताराम तुकाराम राव, श्रीमती कामिनी दत्ताराम राव, श्री. सुनील गोपाळ तारे, श्रीमती भारती सुनील तारे, श्री. संतोष तुकाराम राव, श्रीमती निर्मला संतोष राव, श्री. प्रकाश तुकाराम राव, श्रीमती स्वाती प्रकाश राव, श्री. प्रतापराज पाटील, श्री. मधुकर बुवा धोंगडे, गायक जयेश कराळे, श्री. मकरंद माधवी, श्री. दशरथ केणे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री. राजेंद्र पुराणी, श्री. राजेंद्र पांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

‘यमूबाईंच्या चांगल्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली’

यावेळी समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांनी मनोगत व्यक्त करत स्व. सुरेखा (यमूबाई) तुकाराम राव यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यमूबाईंचे साधे, प्रेमळ आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.

“यमूबाईंनी आपल्या कुटुंबासह समाजातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम केले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस हा केवळ स्मरणाचा दिवस नसून, त्यांच्या चांगल्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेण्याचा दिवस आहे,” असे नानजीभाई ठक्कर यांनी सांगितले.

गरजूंच्या मदतीला धावून जाणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी कार्य करणे हीच यमूबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कुटुंबीयांचे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे त्यांनी अभिनंदन केले. उपस्थितांनी स्व. सुरेखा (यमूबाई) तुकाराम राव यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.