ठाण्यात गणपती बाप्पाचे दर्शन; नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते आरती संपन्न

0

ठाणे । समाजसेवक श्री. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांनी श्री. नटवरलाल विरजीभाई ठक्कर आणि श्री. रमेश पुजारा यांच्यासमवेत ठाणे येथील श्री. दिनेशभाई दीपचंदभाई कोटक यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. नानजीशेठ ठक्कर यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.

गणपती दर्शनाच्या या पवित्र प्रसंगी उपस्थितांनी बाप्पाकडे सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता असून, त्यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनातील अडचणी दूर होऊन प्रत्येक कुटुंबात आनंद नांदावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी समाजातील सर्व सदस्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच समाजामध्ये सदैव एकता, बंधुभाव आणि परस्पर प्रेम कायम राहावे, यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

गणपती बाप्पाच्या दर्शनानिमित्त कोटक कुटुंबीयांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाने गणेशोत्सवाचा उत्साह अधिक वाढला.

Leave A Reply

Your email address will not be published.