३ ते ६ डिसेंबर दरम्यान अकरा खेळांचा भव्य क्रीडा महोत्सव ; दहिसर स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित स्पर्धेत १०० शाळांचा सहभाग

0

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : पश्चिम उपनगरातील मागाठाणे बोरीवली आणि दहिसर विभागातील १०० शाळेतील १४ वर्षाखालील मुले व मुलींसाठी दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशनने ११ खेळांचा भव्य क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे.
३ ते ६ डिसेंबर २०२६ या दरम्यान आयोजित हा क्रिडा महोत्सव दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन क्रीडा मैदान विद्या मंदिर शाळेसमोर दहिसर पूर्व येथे होणार आहे.या संदर्भात माहिती देताना दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनोद घोसाळकर म्हणाले, मोबाईल मध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांनी मैदानात येऊन खेळ खेळावेत त्यांच्यातील क्रिडा गुण विकसित व्हावे यासाठी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या क्रीडा महोत्सवाच्या दरम्यान विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच पाहुणे म्हणून मान्यवर खेळाडू स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित रहाणार आहेत.वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश असून विजेत्यांना ट्रॉफी दिली जाणार आहे.

विभागातील जास्तीत जास्त शाळांनी या आंतर शालेय स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी केले आहे.या माद्यमकर्मी सोबतच उत्तर मुंबई पत्रकार संघ अध्यक्ष विनायक घोडे, सरचिटणीस प्रवीण वराडकर, जगदीश भुवड उपस्थित होते. आंतर शालेय क्रीडा महोत्सवात क्रिकेट, मल्लखांब, लाॅनटेनिस, ॲथलेटिक्स, बुद्धिबळ, कराटे, बॉक्सिंग,रोलर, स्केटिंग,जिमनॅस्टिक या ११ खेळांचा समावेश आहे. ३ डिसेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान आयोजित या क्रीडा महोत्सवात ६ डिसेंबर रोजी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम उपनगरातील जास्तीत जास्त शाळांनी या क्रीडा महोत्सवात भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.