जिल्हा बँक निवडणूक: जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित!
जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या टप्प्यावर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर विविध मतदारसंघांमधील माघारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. अशातच मनव विकास सोसायटी मतदारसंघातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील यांची या मतदारसंघातील बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

भाजप उमेदवार प्रफुल्ल पवारांची माघार
मनव विकास सोसायटी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून प्रफुल्ल पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, निवडणुकीच्या माघारीच्या निर्धारित टप्प्यात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजप उमेदवाराने माघार घेतल्यामुळे या जागेवरील लढतीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून, जयश्री अनिल पाटील यांच्या विजयाचा मार्ग यामुळे पूर्णपणे मोकळा झाला आहे.


महायुतीच्या फॉर्म्युलाचा प्रभाव
जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीमध्ये झालेल्या समोपचाराच्या आणि जागावाटपाच्या चर्चेनंतर अनेक मतदारसंघांत राजकीय समिकरणे बदलताना दिसत आहेत. मनव विकास सोसायटी मतदारसंघातील ही माघार आणि बिनविरोध निवडीचे चित्र महायुतीमधील समन्वयाचे मोठे उदाहरण मानले जात असून, या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.