तर शरद पवार यूपीएच्या काळात प्रधानमंत्री झाले असते; केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

0

मुंबई  |परदेशी मूळ फॉरेन ओरिजिन असणाऱ्या व्यक्तीला देशाचे प्रधानमंत्री करणे योग्य नाही असा मुद्दा उपस्थित करून सोनिया गांधी यांना प्रधानमंत्री पदासाठी विरोध करीत शरद पवार ;पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांनी पत्रक काढले होते.या मुद्द्यावर शरद पवार यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती. यूपीए च्या काळात डॉ मनमोहन सिंह यांनी प्रधानमंत्री पदाची दोन टर्म पूर्ण केली.जर शरद पवार यांनी फॉरेन ओरिजिन च्या मुद्द्यावर सोनिया गांधी यांना विरोध केला नसता तर शरद पवार यूपीए च्या काळात प्रधानमंत्री झाले असते. यूपीए च्या काळात प्रधानमंत्री पदाची एक टर्म शरद पवार यांना मिळाली असती असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले.बांद्रा येथील संविधान निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दीपावली दीपावली पाडवा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा ना. रामदास आठवले यांनी देशभरातील जनतेला यावेळी दिल्या .

दीपावली चा आनंद उत्साह साजरा करताना आतषबाजी मुळे काही ठिकाणी आग लागण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. याबद्दल काळजी घेऊन सावधगिरी बाळगून दीपावली चे पावन आनंदाचे पर्व साजरे करण्याचे आवाहन करीत ना. रामदास आठवले यांनी दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

दिवाळी निमित्त हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय एकत्र आनंद साजरा करतात तसेच ईद निमित्त मुस्लिम बांधवांच्या आनंद हिंदू ही सहभागी होतात.मी बौद्ध आहे. मी हिंदू मुस्लिम सर्वांच्या सणासुदीला शुभेच्छा देतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून सर्व धर्म समभाव आणि बंधुत्वाची शिकवण दिलेली आहे.आज ही अनेक दर्ग्यात मुस्लिमांच्या सोबत हिंदू ही मोठ्या प्रमाणात जात असतात.ही एकमेकांच्या धर्माचा आदर आपसातील भाईचारा आणि संविधानाने दिलेल्या सर्वधर्मसमभाव संस्कृतीचे प्रतीक आहे.असे ना. रामदास आठवले म्हणाले.

राज्यातील दुष्काळ असून त्यावर पाणी आणि चाऱ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल निनो च्या दुष्परिणामांची चाहूल लागताच उपाययोजना सुरू केल्या होत्या.चाऱ्याचे घरी घरी वितरण करण्याचे नियोजन आणि टँकर द्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन राज्य सरकारने केले असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक आघाडीचे मुंबई अध्यक्ष सोहेल शेख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.