मालेगावमध्ये भीषण अपघात, बस-ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

0

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील चाळीसगाव रोडवरील दहिवळ शिवारात बुधवारी भीषण अपघात घडला आहे. बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहेत. मालेगावमधील चाळीसगाव रोडवरील दहिवळ शिवारात बस-ट्रकची भीषण धडक झाली. बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे.

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवाळ शिवारात बुधवारी अत्यंत भीषण अपघात घडला. भरधाव आयशर ट्रक आणि एसटी बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोन महिला प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल २३ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

२ महिला ठार, २३ प्रवासी जखमी
​मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा ही बस ४० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. ही बस मालेगावहुन चाळीसगाव कडे जात असताना दहिवाळ शिवारात चाळीसगावकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रकशी तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताची तीव्रता अत्यंत मोठी होती आणि बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ व आक्रोश पसरला. या दुर्दैवी घटनेत इरशाद बी रमजान मणियार (वय ६०, रा. जामनेर) आणि सखुबाई किरण माळी (वय ६५, रा. एरंडोल) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर घटनेत एकूण २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित मालेगाव येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून, यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

दहाव्या मैलाजवळ भीषण अपघात
दरम्यान, नाशिक– मुंबई -आग्रा महामार्गावर नाशिक ते ओझर दरम्यान दहाव्या मैलाजवळ मंगळवारी सकाळी दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. दुचाकी घसरल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालमोटारीखाली चालक सापडला. या प्रकरणी आडगांव पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.धनंजय कुमार ठाकूर (रा. ओझर टाऊनशीप) हे दहाव्या मैलाजवळ असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (डीआरडीओ) कामगार होते. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास कामावर जात असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. महामार्गावरील अर्धवट आणि अपूर्ण कामामुळे वाहनचालक तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.