लोकसभाच्या निकालापूर्वी सोने-चांदी स्वस्त ! ग्राहकांना दिलासा
सोने- चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. यातच आता लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या एक दिवस आधी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कारण आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,110 रुपये इतका आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असल्यास तर आजचा दिवस तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार, आज देशात 24 कॅरेट सोन्याचा दर 440 रुपयांनी कमी झाला असून त्यानंतर सोन्याचा दर 72,110 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचा 66,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आज एक किलो चांदीच्या दरातही घट झाली आहे. त्यानुसार एक किलो चांदीची किंमत 92,800 रुपये इतकी आहे.
चार महानगरांमधील सोन्याचा दर जाणून घ्या
दिल्ली –
– 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
– 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
मुंबई –
– 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
– 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
कोलकाता –
– 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
– 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
चेन्नई –
– 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
– 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,720 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.