शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाचा दीप अधिक उजळला

0

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; शिक्षणाला प्रोत्साहन देणारा मानवतावादी विद्यार्थी सेवेला समर्पित उपक्रम

जळगाव : आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या माणुसकीच्या भावनेतून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने दिग्विजय स्पोर्ट्स एज्युकेशन अँड मल्टिपर्पज सोसायटी तसेच श्रद्धेय भवरलाल व कांताबाई जैन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या अमुल्य सहकार्या तुन आनंदीबाई देशमुख शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले.

तदरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे संच, स्कूल बॅग प्रदान करण्यात आले. शिक्षण हीच समाज परिवर्तनाची खरी ताकद असून शैक्षणिक साहित्य चे वाटप करुन गरजूं मध्ये शिक्षणाचे दिपक अधिक उजळवणे या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम संस्थे मार्फत राबविण्यात येतो.

या कार्यक्रमाला शहराच्या महापौर दीपमाला काळे प्रमुख अतिथीं सह शाळा संचालक ऋतुजा मेलंग, शांता वाणी, वासंती चौधरी,जितेंद्र बागरे, गौरव महाजन, विनीत तेजकर, विवेक सपकाळ, ओम माळी, रणवीर सिंह, वैभव सोनवणे, ओम चौधरी ,पवन पाटील यांच्यासह आनंदीबाई देशमुख शाळे मुख्य अध्यापिका हर्ष माळी , वर्षा पाठक व कर्मचारी, शिक्षकवृंद व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव शहराचे आमदार माननीय राजू मामा भोळे यांनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य ठेवण्याचे आवाहन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या मानवतावादी उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.