कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

0

जळगाव | जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन तर्फे व जैन स्पोर्ट्स अकॅडमी च्या सहकार्याने कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा दि. १ ते ३ ऑगस्ट, २०२६ दरम्यान कांताई सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेली आहे. यास्पर्धेत प्रवेशाकरिता https://forms.gle/rN1W581dg4n9F7LW8 या लिंकवर नोंदणी करावी.
स्पर्धेत पहिल्या आठ क्रमांकाच्या विजयी खेळाडूंना एकूण १६ हजारांची रोख पारितोषिक तसेच पहिल्या चार क्रमांकाचे खेळाडूंना आकर्षक अशी चषके दिले जातील. स्पर्धेतील सर्व पारितोषिके अॅड. रोहन बाहेती यांच्यातर्फे दिली जाणार आहेत. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व इच्छुक खेळाडूंनी वर दिलेल्या लिंक वर जाऊन आपले प्रवेश दि. ३० जुलै रात्री ०९.०० वाजेपर्यंत निश्चित करावी, असे आवाहन जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन तर्फे राधेश्याम कोगटा, नितीन बरडे व मंजूर खान यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.