संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त लोणंद येथे १६ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी महाप्रसाद सेवा

0

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांसाठी लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य महाप्रसाद सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. शेठ एन. के. टी. ठाणावाला चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजता या महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, लाखो वारकरी भाविकांना बुंदी, पुलाव तसेच ‘गीतासार’ पुस्तिकेचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

लोणंद येथील पालखी मार्गावर होणाऱ्या या सेवाकार्यात आदरणीय शेठ श्री नानजीभाई खीमजीभाई ठक्कर (ठाणावाला), डॉ. बाळासाहेब गोविंदराव खरात, डॉ. विश्वासराव आरोटे, माजी नगरसेवक मनोहर दिवाणे, नाना महाराज देशमुख, राजेंद्र पांडे, राजेंद्र पुराणी, कृष्ण बिरादार, कांतीभाई बोऱ्हाडे (राजगुरूनगर) आणि विठ्ठलराव वरुडे पाटील यांच्या हस्ते प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

यंदाच्या उपक्रमाअंतर्गत केवळ लोणंद येथेच नव्हे, तर पुणे, मंचर, खेड, वाशी, मुलुंड, अकोला, राजगुरूनगर, जव्हार, मोखाडा, कच्छ (गुजरात), अंजार, कर्नाटक, लोणावळा, सरळगाव, मुरबाड, भांडुप, नाशिक, लोणाड, आळंदी तसेच इतर अनेक शहरांमध्येही विविध संस्थांच्या माध्यमातून बुंदी प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

ट्रस्टच्या वतीने सर्व वारकरी भाविकांना या पवित्र महाप्रसाद सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसाठी ही सेवा भक्ती, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.