ग्राहकांना दिलासा ! जळगावात सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण

0

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या दरात सतत चढउतार बघायला मिळत आहे. 28 फेब्रुवारीपूर्वी सोन्याचे दर गगणाला पोहोचले होते. मात्र, जसाही इराणवर अमेरिकेने हल्ला केला तसे सोन्याचे दर कोसळले. उच्चांकापेक्षा सोने खालीच आहे. सोन्याचे दर कमी झाल्याने अनेक लोकांनी सोने खरेदीकडे कल वळवला. मात्र, नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी 1 वर्षासाठी करू नका, असे आवाहन नागरिकांना केले. नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन करताच त्याचे पडसाद सराफा व्यापारात बघायला मिळाले. हेच नाही तर सोन्याच्या दरात घसरण देखील झाली. सोन्यासोबतच चांदीचेही भाव घसरले आहेत. परकिय चलन वाचवण्याकरिता हे आवाहन करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात असतानाही भारतात सोन्याची मोठी खरेदी होत आहे. त्याचा परिणाम परकिय चलनावर होत आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. सोन्याचा 24 कॅरेटचा दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपये आहे तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 66 हजार 770 रुपयांवर आहे. कालच्या तुलनेत सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. भारत हे सोन्याची अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. भारतात विदेशातून सोने आयात केले जाते.कोणताही कार्यक्रम असो सोन्याची देवाण-घेवाण होते म्हणजे होतेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना मोठे आवाहन करत सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या आवाहनानंतर सोन्याच्या दरात 800 रुपयांनी घसरण झाली. पुढील काही दिवसात सोन्याचे दर आणखीन घसरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

युद्धादरम्यान सोन्याचे दर घसरत आहेत. मात्र, यादरम्यानच भारतात सोन्याची मागणी चांगलीच वाढल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, यामुळे व्यापारात तुट निर्माण होत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या भावात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याचा भाव 2 लाखाच्या आसपास गेला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.