प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

0

जळगाव,|  केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या तिसऱ्या फेरीअंतर्गत जळगाव जिल्ह्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये ०८ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध झाल्या असून जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा ९ हजार रुपये विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात चोला मंडलम, एचडीएफसी बँक लिमिटेड, बजाज इन्शुरन्स लिमिटेड या नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार पात्र आहेत. इंटर्नशिपसाठी रुजू झाल्यानंतर ६ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी.

जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतील या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.