जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं ७००० रुपयांनी तर चांदी १४,००० रुपयांनी स्वस्त
जळगाव लाईव्ह न्यूज । सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या आठवडाभरापासून सोनं-चांदी स्वस्त होत आहे. आजही जळगावचा सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आज १ तोळा सोनं ७००० रुपयांनी तर १ किलो चांदी १४,००० रुपयांनी स्वस्त झाली. सोनं-चांदीचे दर कमी झाल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.

सोनं- चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच सोने आणि चांदीचे भाव मोठ्या फरकाने कमी होत आहेत. सातत्याने होत असलेली घसरण आज देखील कायम राहिली. आज १ तोळा सोनं ७००० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना विनाजीएसटी १ लाख २३ हजार रुपये द्यावे लागत आहेत.


तर १० तोळा सोनं ७०,००० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १२ लाख ३० हजार रुपये खर्च करावे लागतील. आज चांदी देखील स्वस्त झाली आहे. १ किलो चांदी १४,००० रुपयांनी स्वस्त झाली असून ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांना विनाजीएसटी १ लाख ५१ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.