जळगाव शहरात ३० वर्षीय तरुणाची हत्या

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर काढू लागली असून अगदी किरकोळ कारणावरूनही हत्येसारख्या घटना घडत आहे. अशातच जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली. आकाश पंडित भावसार (३०, रा. आयोध्या नगर) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. शहरात पुन्हा खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्यानगरमधील आकाश भावसार यांच्या घरी शनिवारी रात्री काही जण आले व त्यांनी आकाशविषयी विचारणा केली, परंतु त्या वेळी तो घरी सापडला नाही. त्यानंतर आकाशच्या पत्नीच्या मोबाईलवरूनच आकाश यास कॉल करून त्याची चौकशी करीत असतानाच कालिंका माता चौक परिसरात एका भरीत सेंटरवर आकाशशी काही जणांनी वाद घातला.

वाद वाढत जाऊन तेथून त्याने पळ काढत तो आयोध्या नगरकडे जात असताना संशयितांनी त्याचा पाठलाग करीत धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यानंतर आकाशचा मित्र कुणाल सोनार याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चार संशयित आरोपींची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.