चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी रेल्वे सेवा सुरू; जळगाव, भुसावळ प्रवाशांना सुविधा

0

जळगाव : देशभरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी, रेल्वेने आणखी दोन नवीन गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक ट्रेन एमजीआर चेन्नई-भगत की कोठी (जोधपूर) पर्यंत धावेल. विशेष जळगाव व भुसावळ येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार आहे. ही गाडी साेमवार, दि. ५ मे पासून धावण्यास सुरूवात होणार आहे. यामुळे बालाजी दर्शनासाठी व अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक 20625 चेन्नई सेंट्रल – भगत की कोठी एक्सप्रेस सोमवारपासून (बुधवार व शनिवार वगळता) आठवड्यातून ५ दिवस चेन्नई सेंट्रल येथून सायं. ७:४५ वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी दु. १२:१५ वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 20626 भगत की कोठी – चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस बुधवारपासून (शनिवार व मंगळवार वगळता) आठवड्यातून ५ दिवस भगत की कोठी येथून सकाळी ५:३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ११:१५ वाजता चेन्नई सेंट्रल येथे पोहोचेल.

मुख्य थांबे असे…
सुल्लुरुपेटा, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, विजयवाडा, खम्मम, वारंगल, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, अंकलेश्वर, वडोदरा, आनंद, साबरमती, मेहसाणा, पाटण, भीलडी, राणिवाडा, मारवाड भीनमाळ, मोडरान, जालोर, मोकलसर, समडडी, लूणी.

रेल्वेतील डब्यांची संरचना अशी…
2 द्वितीय वातानुकूलित
4 तृतीय वातानुकूलित
4 तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी
6 शयनयान
4 सामान्य द्वितीय श्रेणी
1 लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन

Leave A Reply

Your email address will not be published.