जळगाव सुवर्णपेठेत चांदीने गाठला ९७ हजाराचा टप्पा

0

जळगाव । दिवाळी अगदी जवळ आली असताना सोने चांदी दरात सुरु असलेली दरवाढ थांबताना दिसत नाहीय. आता सोन्यापाठोपाठ चांदीनेही उच्चांकी दर गाठला. जळगावच्या सुवर्णपेठेत एकाच दिवसात चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ होत चांदीही ९७००० रुपये (जीएसटी वगळून) किलो पोहोचली असून हा आजवरचा उच्चांकी दर आहे. सोने प्रती तोळा ७८ हजारांवर पोहोचले.

इस्त्राइल-हमास यांच्यातील युद्धासह अमेरिकेच्या निवडणुकांचा परिणाम म्हणून चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिवाळीनंतरही हीच स्थिती कायम राहिल्यास चांदीचे दर सव्वा लाखांच्या घरात जाऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

गुरुवारी सोने ७७१०० (जीएसटीसह ७९४१३) प्रती तोळा तर चांदी ९३००० रुपये किलो वर होते. शुक्रवारी सकाळी सोन्याच्या ९०० रुपयांची वाढ होवून ७८००० हजारांवर गेले. चांदीच्या दरातही १ हजारांची वाढ नोंदवली गेली. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय सोने चांदी बाजार बंद असतो. तरी संध्याकाळी चांदीच्या दरात ३ हजारांची तेजी आली. चांदी ९७००० रुपये प्रती किलोवर पोहचली. तर सोन्याचे दर २०० रुपयांनी वाढले.

इस्त्राईल हमास युद्धामुळे यामुळे चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. दिवाळीनंतर युद्धाचा भडका वाढल्यास चांदीचे दर १ लाख २० हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय बाजारापेठेतील जाणकार व्यक्त करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.