दहशतवादी हल्ल्यात चोपडा येथील जवानाला वीरमरण

0

चोपडा : बांगलादेश सीमेवर बीएसएफमध्ये कार्यरत असणारा जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. सोमवारी दुपारी बांगलादेश सीमेवर त्रिपुरात ही घटना घडली.

दहशतवाद्यांशी लढताना चोपड्याचे जवान अरुण बडगुजर हे शहीद झाले. त्रिपुरा येथे बीएसएफमध्ये ते कर्तव्यावर होते. बांगलादेशाच्या सीमेवर त्रिपुरा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. अरुण दिलीप बडगुजर हे चोपडा साईबाबा कॉलनीमधील रहिवासी होते. अरुण बडगुजर हे गेल्या 20 वर्षांपासून बीएसफमध्ये कार्यरत होते. त्यांची निवृत्ती अवघ्या ४ महिन्यांवर आली होती.

दरम्यान, सोमवारी बांगलादेश सीमेवर त्रिपुरात दहशतवादी हल्ल्यात गोळी लागल्याने ते शहीद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथून त्यांचे पार्थिव बीएसएफच्या वाहनाने मूळ गावी आणले जाणार आहे. अरुण दिलीप बडगुजर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यंसस्कार होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.