खूशखबर… जळगावच्या सूवर्णनगरीत सोने-चांदी 3 हजारांनी स्वस्त

0

जळगाव | देशाच्या अर्थसंकल्पात सोन्या आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांनी कमी केल्याची घोषणा झाल्यामुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्या-चांदीचे दर घरसले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 3 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरातही 3 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 73 हजार रुपयांवरून 70 हजार रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर हे 90 हजार रुपयांवरून 87 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात चढ-उतार होत असल्याने सराफ व्यावसायिक तसेच ग्राहक संभ्रमात होते. मात्र आता तब्बल 3 हजार रुपयांनी सोन्याने आणि चांदीचे दर कमी झाल्यामुळे त्याचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आगामी काळात सण-उत्सव असल्याने सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. देशाचा अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याची घोषणा झाल्याने त्याचा जळगावच्या सराफ बाजारात परिणाम झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जातोय.

Leave A Reply

Your email address will not be published.