जळगावात भरधाव कारने ५ महिलांसह २ चिमुरड्यांना उडविले ; एक जण ठार

0

जळगाव । जळगावच्या मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या ५ महिलांसह २ चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१९ जुलै) सायंकाळी ६:३० वाजता घडली आहे. या दुर्घटनेत चार महिला जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर संतप्त जमावाने कार चालकाला बेदम चोप दिला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावच्या वेरूळ परिसरातील मंगलपुरी भागात काही महिला आपल्या घरासमोर अंगणात गप्पा मारत उभ्या होत्या. याचवेळी एक भरधाव कार त्यांच्या दिशेने आली. कारवर चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या या महिलांना धडक देत उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, दुध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातातील कारचा चालक कार चालक पवन कैलास पाटील (वय 25) रा. सप्तशृंगी कॉलनी रामेश्वर कॉलनी मेहरूण जळगाव हा नवशिक्या असल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्यावर त्यास पकडून नागरिकांनी जागेवरच चांगला चोप दिला.

या अपघाताबाबत पोलिसांनी माहिती दिली असून कारवरील चालक तरुणाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नियंत्रण सुटल्यानंतर ब्रेक दाबण्याऐवजी तरुणाने रेसवर पाय ठेवला त्यामुळे कारचा वेग वाढला व या कारणे महिलांना धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचा पोलिसांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.