टाकेद परिसरातील विजेचा लपंडाव थांबवा : राम शिंदे यांचे वीज वितरणला निवेदन

0

इगतपुरी: इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून सर्रासपणे विजेचा लपंडाव चालू असून या प्रश्नासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी इगतपुरीचे महावितरणचे उपविभागीय अधिकारी सचिन माळी यांना पूर्व भागातील लाईट प्रश्न सोडविण्यात यावा यासंदर्भात निवेदन देत आढावा घेतला. या आढावा बैठकीत पूर्व भागातील भविष्यातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.यात पूर्व भागातील चाळीस वाड्या वस्त्या व वीस पंचवीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महावितरण कर्मचारी वर्ग वाढवून दरवर्षीच्या डी पी आर निधीतून जुने स्ट्रकचर बदलण्यात यावे,सर्रासपणे टाकेद पट्ट्यात खंडित होणारा विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा.

दरवर्षीच्या डी पी आर निधी मध्ये पावसाळा पूर्व नियोजन नवीन उपाययोजना करण्यात याव्यात,परदेशवाडी सबस्टेशन ला जोडणारी व सर्रासपणे 33 के व्ही बिघाड होणारी लाईन सुरळीत करण्यात यावी,टाकेद सह परिसरातील सर्रासपणे फेल होणारे ट्रान्सफॉर्मर जास्त व्होल्टेजचे टाकण्यात यावे,टाकेद सत्याई डी पी चे ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलून 25 व्होल्टचे टाकण्यात यावे,परदेशवाडी सबस्टेशन अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक फिडर चा वीजपुरवठा नियमितपणे सुरळीत करण्यात यावा.अश्या विविध मागण्या यावेंळी या बैठकीत राम शिंदे यांच्याकडून करण्यात आल्या.

निवेदन देतेवेळी या आढावा बैठकी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्यासमवेत,जेष्ठ सहकारी उत्तम मोंढे, संदीप कोरडे,सागर मोंढे आदीं उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद गट व परिसरात गेल्या महिनाभरापासून मागील दहा बारा दिवसांत सर्रासपणे विजेचा लपंडाव चालू आहे कायम या परिसरात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असतो कायम 33kv ब्रेकडाऊन ,घोटी सबस्टेशन अंतर्गत परदेशवाडी सबस्टेशन वर अवलंबून असलेले टाकेद परिसरातील सर्वच फिडर सातत्याने कायम बंद असतात. या कारणास्तव टाकेद व परिसरातील सर्व गाव व वाड्या वस्त्यामधील ग्रामस्थ नागरिक शालेय विद्यार्थी सुशिक्षित तरुण वर्ग यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे,सर्रासपणे होत असलेला विजेचा लपंडाव या समस्येने या परिसरातील जनजीवन कायम विस्कळीत होत असते,दरवर्षी पावसाळा सुरू होताच या भागात 33 kv foult ,11kv विद्युत पोल पडतात,तर अनेक ठिकाणी विद्युत तारा, विद्युत रोहित्र सातत्याने फेल होतात या कायमच्या समस्येमुळे जवळपास वीस पंचवीस ग्रामपंचायत आणि चाळीस वाड्या वस्त्यांमधील जनजीवन कायम अंधारात राहते.

परिणामी पावसाळी वातावरणात सध्याच्या परीस्थितीत शाळा महाविद्यालयिन प्रवेश प्रक्रिया,बँकिंग सेवा,ऑनलाइन सेतू कार्यालये, आधार सेवा,ऑनलाइन kyc आधारकार्ड उपकरणे बंद असतात यामुळे या भागातील ऑनलाइन सेवा मोबाईल दूरध्वनी बंद असतात या कारणास्तव शालेय विद्यार्थी,ग्रामस्थ,महिला नागरिक हे त्रस्त होत असून या सर्व समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी आपले तालुक्याला जिल्हा नियोजन समिती DPDC ,महामंडळ कडून पावसाळा पूर्व नियोजन करण्यासाठी DPR फंड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असतो. या DPR निधीतून आपण योग्य नियोजन करून जुने जीर्ण झालेले विद्युत पोल ,विद्युत रोहित्र ,सर्व जीर्ण झालेले विद्युत स्ट्रकचर यंत्रणा वेळीच दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासोबतच अनेक ठिकाणी पावसाळी वातावरणामुळे ट्रान्सफॉर्मर मार्फत ओव्हर लोड वीज पुरवठा होत असल्याने ग्राहकांच्या स्थानिक ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन वीज ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. मागील महिन्यात टाकेद येथील सत्याइ डी पी अंतर्गत वीज पुरवठा होत असलेल्या परिसरातील अनेक मोबाईल दुकान ग्राहकांचे इन्व्हर्टर,बॅटरी,अडॅप्टर,मोबाईल चार्जेर,इलेक्ट्रॉनिक मोटार,दैनंदिन वापरातील electronic वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान टाकेद येथील सत्याइ चौकातील डी पी ट्रान्सफॉर्मर हे 15 kv चे असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोड असल्याने सदर ठिकाणी कायम ट्रान्सफॉर्मर फेल होत असतात तरी सदर ठिकाणी आपण लवकरात लवकर 25 kv चे ट्रान्सफॉर्मर टाकण्यात यावे. सातत्याने याठिकाणी तांत्रिक बिघाड होत असल्याने या परिसरातील नागरिक कायम अंधारात असतात तरी हे सर्व प्रश्न आपण सोडवावेत असे या निवेदनात म्हंटले आहे.

प्रतिक्रिया :

“टाकेदसह सर्वच गावातील गावठाण कार्यक्षेत्रात 24 तास विभक्त वीज पुरवठा देण्यात येनार असून याचे कामकाज लवकरच पूर्ण होणार आहे, शेतकऱ्यांना 24 तास विभक्त थ्री फेज वीज पुरवठा देण्यात येणार आहे,लवकरच पाचपट्टा येथून wind energy प्रोजेक्ट अंतर्गत परदेशवाडी सबस्टेशन ला नव्याने 132 kv वीजपुरवठा लाईन टाकण्यात येणार आहे यामुळे टाकेद परिसरातील लाईट प्रश्न कायमचा सुटणार आहे.”
– सचिन माळी (उप विभागीय अधिकारी महावीतरण इगतपुरी)

“आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून भरविर भंडारदरावाडी सबस्टेशन मंजुर आहे यामुळे भविष्यात टाकेद सह संपूर्ण परिसर कायमस्वरूपी 24 तास प्रकाशमय असणार आहे,यांसह वायरमन कर्मचारी संख्या वाढ होण्यासाठी टाकेद गटासाठी नवीन बाय फरगेशन अंतर्गत विभक्त ग्रामीण उपकेंद्र परदेशवाडी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
– राम शिंदे
सामाजिक कार्यकर्ते टाकेद

Leave A Reply

Your email address will not be published.