जळगाव शहरात अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार

0

जळगाव | जळगाव शहरात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव रामानंद नगर पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही जानेवारी २०२१ ते ०७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जळगाव शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत वास्तव्यास असताना आरोपी निलेश कमलाकर गुरव (वय ३२, रा. फैजपूर, ता. यावल, जि. जळगाव) याने पिडीत मुलीच्या आतेभावाचा व नातेसंबंधाचा गैरफायदा घेतला. आरोपी हा वारंवार पीडितेच्या घरी येत असे. त्या दरम्यान आरोपीने पीडित मुलगी ही घरात एकटी असताना तिच्या मर्जीविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केला.

तसेच आरोपीने याबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वरकड (रामानंद नगर पोलीस स्टेशन) हे करत आहेत. पोलिसांनी आरोपी निलेश कमलाकर गुरव याला दि. १९/१२/२०२६ रोजी सकाळी ०२.०४ वाजता अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.