सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम

0

ठाणे, | सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या ध्वजारोहण श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते करण्यात आले.श्री. रामजीभाई पटेल, श्री राजेंद्र पुराणि, प्राचार्या सौ. शर्मिला मादीवाले, सौ. जयश्री कुमार, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर ध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि आनंदमय झाले

Leave A Reply

Your email address will not be published.