वुमेन्स ॲन्ड चाईल्ड केअर प्लसचा शैक्षणिक उपक्रम; ४०० विद्यार्थ्यांना वह्या, दोन विद्यार्थिनींना सायकलींची भेट

0

जळगाव : वुमेन्स ॲन्ड चाईल्ड केअर प्लस आणि आधार जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कष्टकरी महिलांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सुमारे ४०० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

जैन इरिगेशन सिस्टीमच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. तसेच नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या सहकार्याने दिव्यांग व एकल पालक असलेल्या गौरी निंबाळकर आणि अबोली गुजारे या दोन विद्यार्थिनींना सायकली भेट देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. निलिमा जोशी, डॉ. ममता काबरा आणि नगरसेविका जयश्री पाटील उपस्थित होत्या.

संस्थेच्या अध्यक्षा शांता वाणी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच राजमालती नगर येथील बुद्ध विहारात संस्थेची तिसरी शाखा सुरू करण्यात येणार असून, त्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ग सुरू केले जाणार असल्याची घोषणा केली.

अध्यक्षीय भाषणात नीळकंठ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीरूपाने प्रेरणादायी मार्गदर्शन केले. डॉ. निलिमा जोशी आणि संभाजी देसाई यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना गडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीना कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला कष्टकरी महिला, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपाली पवार, शालिनी चौधरी, अर्चना पाटे, हेमलता कुलकर्णी, नंदा पाटील, समता भावसार, तनुजा चोपडे, ज्योती दातेराव, साक्षी सूर्यवंशी तसेच आधार जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.