राष्ट्रवादीचे खंबीर नेतृत्व : सुनेत्रावहिनी…. महाराष्ट्राच्या ताराराणी !

0

(राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त हेमंत रणपिसे यांचा विशेष लेख …)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन आता 27 वर्षे पूर्ण होत आहेत.या काळात पाणी पुलाखालून बरेच वाहून गेले आहे.अगदी पुलच वाहून गेलाय…राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन भाग झालेत. त्यावर माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली आहे. त्या इतिहासाच्या तपशीलात आता जाण्याची आवश्यकता नाही.आपण त्या सर्व घडामोडी जाणत असल्याने आता थेट मुद्द्याचे सांगतो.आज 10 जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन.संस्थापक शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने दिनांक 10 जून ला 27 वा वर्धापन दिन साजरा केला तर दिनांक 11 जून ला राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार ) यांच्या पक्षाने वर्धापन दिन सोहळा मुंबईत साजरा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका भागाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार करीत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार या पक्षाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार करीत आहेत. सुनेत्रावहिनी यांचे नेतृत्व खंबीर आहे.
दिवंगत लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांनी मोठे धाडस दाखवून आपल्या नेतृत्वात वेगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला.अनेक वेळा उपमुख्यमंत्री आणि मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याची; देशाची आणि समाजाची खूप मोठी सेवा त्यांनी केलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाचा; कर्तृत्वाचा वारसा; विचारांचा वारसा; अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराबाबत पाहिलेली स्वप्ने ही सुनेत्रावहिनी यांनाच चांगली ठाऊक असणार.अजितदादांच्या नेतृत्वाचा वारसा त्यांनी खंबीरपणे आणि गंभीरपणे स्वीकारला आहे.

अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याच्या दुःखद घटनेच्या धक्क्यातून आजही महाराष्ट्र बाहेर पडलेला नाही.आजही अजितदादांच्या अपघाती निधनाचे दुःख सर्वांच्या मनात आहे. ते आभाळा एवढे दुःख सुनेत्रावहिनी आणि त्यांच्या परिवाराला झालेले आहे. तरीही सुनेत्रावहिनी यांनी अजितदादा पवार यांचे निधन झाल्यानंतर लगेच तीन दिवसांत उपमुखमंत्री पदाची शपथ का घेतली म्हणून काही अतिविद्वान लोकांनी चर्चा केली.अनेकांच्या मनात याबद्दल प्रश्न चिन्ह होते.त्यात कहर म्हणजे मराठीचे एक आघाडीचे वृत्तपत्र असणाऱ्या दैनिकाने पहिल्या पानावर आदरणीय सुनेत्रावहिनी यांच्यावर टीका करणारा अग्रलेख लिहिला.त्या संपादकाची ती चूक होती असे मला वाटते.एका महिलेवर टीका करणाऱ्याने बुद्धीचा कस लावताना नीतिमत्तेचा विसर पडू देता कामा नये.

अजितदादा पवार यांच्या निधनानंतर लगेच तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा सुनेत्रा
वहिनींचा निर्णय अत्यंत योग्य निर्णय होता. अजितदादा पवार या कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्यानंतर सैरभर निराधार झालेल्या राष्ट्रवादी परिवाराला सांभाळण्यासाठी आधार देण्यासाठी कंबर कसून धैर्याने पुढे येणे आवश्यक होते. दगाफटका होऊ नये म्हणून तातडीने नेतृत्वाची धुरा सांभाळणे आवश्यक होते. अजितदादांच्या निधनानंतर तातडीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या सुनेत्रावहिनी या महाराष्ट्राच्या ताराराणी ठरल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर जेव्हा रायगडाला मुघलांनी वेढा दिला.तेंव्हा मुघलांच्या हाती लागून सर्व हिंदवी स्वराज्य नष्ट होण्याची भीती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य वाचविणे हेच मुख्य उद्दिष्ट्य महाराणी ताराराणी यांचे होते.त्यामुळे रायगडाला वेढा पडला असताना त्यांनी स्वराज्याचे वारस राजाराम महाराजांसोबत रायगडाच्या वाघ दरवाजातून त्या निसटल्या.तिथून पुढे त्यांनी तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यातून स्वराज्याची राजधानी चालविली.अनेक वर्ष त्यांनी औरंगजेबाला झुंज दिली.मुघलांना सळो की पळो करून सोडले.महाराणी ताराराणी या योध्दा होत्या.त्यांनी अनेक लढाया जिंकल्या.स्वराज्य टिकविले.औरंगजेब अहिल्यानगर येथे मृत्यू पावला.शेवट पर्यंत त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य जिंकता आले नाही.महाराणी ताराराणी यांनी मोठ्या शौर्याने मुघलांना टक्कर देऊन हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवले.तीच भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांची ठरली आहे.अजितदादा यांच्या निधनानंतर अजितदादा यांची राष्ट्रवादी वाचविणे सांभाळणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते.त्यासाठी राष्ट्रवादी परिवाराला खंबीर नेतृवा देणे आवश्यक होते.पक्षाची आणि सत्तेची सूत्रे हाती घेणे आवश्यक असल्याने सुनेत्रा वहिनी यांनी तेंव्हा तातडीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.महाराणी ताराराणी जशा स्वराज्या साठी पुढे आल्या तशाच सुनेत्रावहिनी या राष्ट्रवादी काँग्रेस साठी पुढे आलेल्या आहेत. त्यांचे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कौतुक करीत आहे.कोण्या एका दैनिकाच्या नीतिमत्ता विहीन संपादकाने मात्र सुनेत्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच जाहीर टीका केली होती.त्या संपादकाला आंबेडकरी विचार धारेशी घेणेदेणे नाही.तसेच त्यांना मराठ्यांचा शौर्य पराक्रमाचा इतिहास माहित नाही.पती राजाराम यांच्या निधनानंतर महाराणी ताराराणी यांनी ज्या हिंमतीने शौर्याने पुढे येऊन हिंदवी स्वराज्याच्या किल्ला लढविला.त्याला इतिहासात तोड नाही.कर्तृत्व गाजविणाऱ्या स्त्रियांना महाराष्ट्राने नेहमीच साथ दिली आहे.त्यांचे कौतुक केले आहे. पतीचे निधन हे स्त्रियांच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळण्यासारखे आहे.ते दुःख उरात बाळगून आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसून हिंमतीने पुढे आलेल्या सुनेत्रा वहिनींना संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा आहे.त्यांचा अभिमान आहे.त्यांच्यात आम्हाला महाराणी ताराराणी ची भूमिका दिसते.

वैधव्य आलेल्या महिलेवर टीका करणारा कोणीही असो तो कोत्या मनोवृत्तीचा ठरतो.अशा वृत्तीचा आम्ही धिक्कार करतो.

आज मात्र संपूर्ण महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी यांच्या खंबीर नेतृत्वाचे कौतुक करीत आहे. आम्हाला विश्वास आहे. सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी घोडदौड करीत राहील.

.उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांचे नेतृत्व खंबीर असल्याचे अनेक उदाहरणे घडली आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची केलेली राष्ट्रीय कार्यकारिणी असो की नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गोंदिया चे राजेंद्र जैन यांना राज्यसभा उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय असो.या सर्व निर्णयांमध्ये त्यांची दूरदर्शी ; खंबीर भूमिका दिसते. पक्षांतर्गत राजकारणावर आपली मजबूत पकड ठेवण्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत.दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील राष्ट्रवादी काँग्रेस घडविण्यात; पुढे घेऊन जाण्यात त्या निश्चित यशस्वी होतील.याबाबत काही शंका नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वात अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रगती करीत राहो हीच सदिच्छा! अजितदादा पवार यांची फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राशी; धर्मनिरपेक्ष; सर्व धर्म सम भाव या तत्वांशी बांधिलकी होती.तो विचारांचा वारसा सुनेत्रा वहिनी या मजबुतपणे पुढे घेऊन जातील अशी अपेक्षा बाळगून राष्ट्रवादी काँग्रेस च्या 27 व्या वर्धापन दिनाच्या त्यांना शुभेच्छा देतो!
जय भीम!
-हेमंत रणपिसे, संपादक स्टार महाराष्ट्र.+91 95944 88525, प्रसिद्धी प्रमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

Leave A Reply

Your email address will not be published.