कर्तव्यदक्ष पोलीस स्टेशन च्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सत्कार सोहळा संपन्न
महाराष्ट्र राज्याची पोलीस यंत्रणा ग्रामीण असो कि शहरी असो दिवसें दिवस खूप ऍक्टिव्ह होत चालली असून मुंबई पोलीस तर सध्या जनते साठी भरपूर मेहनत घेत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा दिवा येथील क्रियाशील, पोलीस वृंद, धडाडीचे कार्य करत असून काल हरवलेल्या सात वर्षाच्या छोट्या मुलीला वरिष्ठा च्या सहभागातून दोन च दिवसात शोधून काढण्यात यश मिळाले आहे.

अवैध धंदे असतील, किंवा अन्याय अत्याचार चा कुठलाही विषय असेल, दिवा पोलीस स्टेशन नेहमीच त्या त्या विषयाला न्याय देऊन फुल स्टॉप देण्यात अग्रेसर असल्यामुळे दिव्यातील सर्व स्तरावरून पोलीस वृंदाचे अभिनंदन पर कौतुक करण्यात येत आहे. दिवा चे सामाज प्रबोधन कार्यकर्ते बालाजी कदम आणि सौं. सुरेखा तोरणे ह्यांच्या नेतृत्वा खाली मान्यवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दिव्य सत्कार करण्यात आले. त्यात प्रामुख्याने पो. अधिकारी तोरडमल साहेब, पो. अधिकारी कोळेकर साहेब,पगार साहेब , खतेले साहेब,सावंत साहेब,माने साहेब,जाधव साहेब आणि अधिकारी सौं.शर्मा मॅडम जी ह्यांचे बालाजी कदम साहेब, सुरेखा तोरणे ताई आणि अश्विनी अमोल केंद्रे ह्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, ह्या वेळेस सौं.रंजना घोडेराव, सौं रेणुका कांबळे, सौं. अश्विनी माने शिला इंदराळे, निर्माता, दिग्दर्शक वाघ साहेब आणि पत्रकार संदीप जी उपस्थित असूनह्यांनी अभिनंदन पर दोन शब्द अर्पण करून ह्या वेळेस पो. निरीक्षक आदरणीय कोळेकर साहेब ह्यांनी मुलीला शोधून आणण्याचे श्रेय सर्व पो. अधिकारी वर्ग सहकारी वर्ग, आणि पो. निरीक्षक अनिल शिंदे साहेब, सर्व टीम आणि दिवा वासियांना जाहीर केले.हा कौतुकपर सोहळा दिवा वासिय जनतेसाठी मुलगी मिळाल्या बद्दल चर्चेचा विषय झाला.

