4 वर्षांचा संघर्ष अखेर फळाला; भडणे येथील किरण इंडियन आर्मीत दलात
आदर्श विचार संस्कार मेहनत जिद्दीच यश…..,,,,,,

संघर्ष आणि जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर देसले कुटुंबात चमकला किरण
अपयशाच्या अनेक वादळांना सामोरं जात अखेर होतकरू किरण देसले यांनी इंडियन आर्मी चे स्वप्न सत्यात उतरवत दिमाखदार यश संपादन केले आहे.
भडणे येथील सामान्य अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील किरण देसले याने आपल्या शालेय शिक्षणाबरोबर शेती मोल मजुरी तसेच लग्नकार्यात केटरिंगचे काम करून शिक्षण घेत आई-वडिलांना हातभार लावून आर्मी व बीएसएफ मध्ये जाण्याच स्वप्न जिद्द चिकाटी व स्वतःचा आत्मविश्वासाने सत्यात उतरून आई वडिलांचे स्वप्न साकार केले या शुभ घटनेची बातमी जेव्हा आई-वडिलांना कळले तेव्हा संपूर्ण देसले कुटुंब आनंदाचे अश्रू अनावर झाले कठीण अशा परिस्थितीतून मार्ग काढत केलेला हा प्रवास आज अनेक युवकांसाठी प्रेरणेचा दीप ठरत आहे. तब्बल 4 वर्षांच्या संघर्षमय प्रवासात अनेकदा अपयश आले, यात कधी बीएसएफ आर्मीत व इत्यादी भरतीत वेटिंग पर्यंत मजल मारत अवघे एक दोन गुणांनी अपयशाला सामोरे जावे लागत होते


मात्र हार न मानता परिस्थितीनेही कठोर परीक्षा घेतली परीक्षेला जाण्यासाठी भाडे नव्हते किरणने कधीही आई-वडिलांना पैशासाठी त्रास दिला नाही मोलमजुरी तसेच मंगल कार्यालयात केटरीगचे चे काम करून, आलेल्या पैशातून फार्म भरणे परीक्षेसाठी लागणारा खर्च तो पेलवत होता यासाठी आई-वडिलांच योगदान मोलाचे ठरले पण त्यांनी कधीच हार मानली नाही. प्रत्येक वेळी नव्या जिद्दीने उभं राहत त्यांनी आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून अथक मेहनत सुरूच ठेवली. दररोज दोन तास रनिंग चार तास अभ्यास हा सायंकाळचा नित्य नियम चालू ठेवला सोबत सतीश मालचे कुणाल देसले यांचे सहकार्य
आई-वडिलांनी दिलेले संस्कार, कष्ट आणि मोलाचा पाठिंबा हेच त्यांच्या यशामागचे खरे बळ मोठ्या भावाचे मार्गदर्शन मित्रांचे सहकार्य. पहाटेच्या धावण्यापासून ते कठोर मैदानी सरावापर्यंत, दिवस-रात्र घाम गाळत त्यांनी स्वतःला सिद्ध केले. यश एका दिवसात मिळत नाही; त्यामागे अनेक वर्षांचा त्याग, संयम, मेहनत आणि संघर्ष दडलेला असतो, हे कीरण यांच्या प्रेरणादायी प्रवासातून स्पष्टपणे दिसून येते. कारण चार वर्षापासून भरती परीक्षा देत होता
देशसेवेचे स्वप्न मनात ठेवून त्यांनी संकटांवर मात केली. अनेक अपयश पचवत पुन्हा नव्या उमेदीने उभं राहणं, हीच त्यांच्या यशामागची खरी ताकद ठरली. संघर्ष हा जीवनातील पहिला शिक्षक असतो आणि त्यातूनच यशाचा मार्ग तयार होत असतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.आजच्या तरुणांसाठी त्यांचा प्रवास हा आत्मविश्वास, मेहनत आणि चिकाटीचा जिवंत आदर्श ठरत असून, “अपयश हे शेवट नसते; संघर्षातूनच यश जन्माला येते,” हा संदेश त्यांच्या यशातून युवकांना मिळत आहे. परिस्थिती गरिबीची असताना आई वडील व मोठे बंधू यांचे स्वप्न आपल्या जिद्दीतून साकार करून सामान्य कुटुंबातून बाहेर पडून इंडियन आर्मीत पोहोचलेला किरण आज आपल्या कुटुंबात अभिमानाचा विषय ठरला आहे. त्यांच्या या यशामुळे गावात परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये नव्या उमेदीची प्रेरणा निर्माण झाली आहे. तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत किरण यांने प्रथमच भडणे गावात पहीलाअग्नी वीरआणि इंडियन आर्मी जाण्याच स्वप्न पूर्ण केल्याने कुटुंबातही आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे.