कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांचा प्रकाशोत्सव

0

गर्दी गोंधळ गोंधळ हुल्लडबाजीला आळा

वन्यजीव विभागाने यंदा केली कठोर नियमावली.

इगतपुरी | नाशिक शहरापासून अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या भंडारदरा येथील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांचा प्रकाशोत्सव रंगात आला असून दोन दिवसांपूर्वी विजांच्या कडकडाटात पडलेल्या वळव्याच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर काजव्यांच्या लखलखाटात अभयारण्यातील वृक्षराजीवर अधिकच वाढला आहे निसर्गाचा सृष्टी वरील हा अद्भुत नजारा डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने अभयारण्याकडे वळू लागली आहेत कठोर नियमावली आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे यंदा नाशिक वन्यजीव विभागाने पर्यटकांना शिस्त लावण्यास बऱ्यापैकी यश मिळविले आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने मागील वर्षी वन्यजीव विभागाला काजव्यांच्या उत्पत्ती काळात अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना नियमांची कठोर चौकट आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ताकद दिली होती यानुसार वन्यजीव विभागाने यावर्षी अभयारण्यात दोन्ही प्रवेशद्वारावरून सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेशाची वेळ मर्यादा निश्चित केली आहे या वेळेत केवळ दोन हजार पर्यटकांना आत मध्ये सोडण्यात येत आहे प्रत्येक पर्यटकांचा आधार कार्डचा फोटो वाहन क्रमांक पर्यटक संख्या नोंदवून घेतली जात आहे मोबाईल टॉर्च बॅटरी कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा वापरावर तसेच लहान मुलांच्या लाईटच्या शूज वर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांनी वनविभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत पर्यावरण स्नेही इको टुरिझम चा आनंद घ्यावा असे आवाहन अभयारण्याचे सहाय्यक वन संरक्षक अनिल पवार यांनी केले आहे

पर्यावरण स्नेही इको टुरिझम चा भागवा. अति संवेदनशील जैवविविधता या भागात आहे का जवा अल्पायुषी कीटक या जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक आहे काजव्याचा हा प्रजनन काळ असतो नर काजवा लुकलुकत मादीला स्वतःकडे आकर्षक करत एक प्रकारे संवाद साधत असतो आपल्या गोंगाट गोंधळ व कल्लोळामुळे त्याचा हा संवाद तुटून नरकाजवा मृत्युमुखी पडू शकतो बे जबाबदार वर्तन टाळावे कृत्रिम प्रकाश साहित्याचा कुठलाही वापर अभयारण्य क्षेत्रात करू नये असे आव्हान वन्य जीव विभागासह निसर्गप्रेमी पर्यावरण अभ्यासकांकडून करण्यात आले आहे हरिचंद्र गडाच्या पायथ्यालाही चमचम राजूर वनपरिक्षेत्राच्या येथील हरिचंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या फोप संडी पाच नई कुमशेत या गावांमधील वृक्ष राजे वर सुद्धा काजव्यांची चमचम पहावयास मिळत आहे या ठिकाणीही वन्यजीव विभागाने रात्रीची गस्त वाढविली आहे

सायंकाळी सहा ते रात्री नऊ या निश्चित केलेल्या कालावधीत पर्यटक या भागात सुद्धा जाऊन नियमांचे पालन करत काजवे बघू शकतात रोजगार निर्मितीला चालना काजवे बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे या भागात रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे अभयारण्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी मुक्कामी कॅम्पेनिंग राहणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक आदिवासी बांधवांनाही रोजगार मिळत आहे मुक्कामी राहणाऱ्या पर्यटकांना सुद्धा रात्री जंगलात फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे १९ पार्किंग सणाची उभारणी पर्यटकांनी अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर त्यांची वाहने पार्किंग स्थळावरच उभी करणे बंधनकारक करण्यात आले आहे वन्यजीव विभागाने अभयारण्य क्षेत्रात रस्त्यालगत पार्किंग स्थळे तयार केली आहेत या ठिकाणी बॅरिकेट्स वनरक्षक वनमजुरांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक पार्किंग सळी तसेच काजवेच्या झाडावर आहेत तेथे वन कर्मचारी पर्यटकांना आवश्यक सूचना देत होते असे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी सांगितले पर्यटकांनी रस्त्याच्या कडेने पायी चालत झाडावर लुकलुकणारे काजवे बघण्याचा आनंद शनिवारी व रविवारी मोठ्या संख्येने घेतला

Leave A Reply

Your email address will not be published.