राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ महत्वाचे निर्णय

0

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यात शेतकरी, पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयासह मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधी उभारण्यासही हिरवा कंदील देण्यात आला. दुसरीकडे, मुंबईतील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करत हैद्राबाद नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठात ६ नामांकित महाविद्यालयांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णयही सरकारने घेतला आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

1. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता.

2. रस्त्यांच्या सुधारणेसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँके व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला दोन्ही बँकाकडून मिळणार प्रत्येकी ८ हजार ७०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. राज्यातील रस्ते सुधारणा व विकासाला आणखी गती मिळणार.

3. हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये सहा महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मुंबई. किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, मुंबई. श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई. ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय, मुंबई व थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश होणार.

 

Leave A Reply

Your email address will not be published.