उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पेशंट लोकांची स्टाफ कडून दुर्दशा

0

सरकार दरबारी आपले कर्तृत्व आणि नेतृत्व अव्वल दर्जाचे साबित करून दाखवणारे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या ठाणे जिल्ह्यातील ठाण्याच्या सिविल हॉस्पिटल मध्ये मात्र दवाखान्याच्या स्टाफ कडून गालबोट लागत असून डीन चे थोडेही लक्ष नसल्याचे निदर्शनास आले.
ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन साठी लाईनला लागलेल्या महिला ऑपरेशन झाल्यानंतरही, वार्ड मध्ये शिफ्ट करण्यासाठी एक एक दीड दीड तास वाट बघावी लागत आहे असे चित्र डोळ्यासमोर आले.

उटी मधील लोक सांगतात का पेशंटला घ्यायला किंवा मावशी किंवा मामाला घेऊन या वार्ड नंबर 10 मध्ये जाऊन, वार्ड नंबर 10 मधील लोक सांगतात मुकादम ला फोन केलेला आहे. मुकादम आपल्या गुर्मीमध्ये वावरतात पण पेशंटकडे पाठवायला कुणालाही वेळ नाही. पेशंट सोबत आलेले लोक स्वतः स्टेचर वर घेऊन जायला तयार असताना ओ.टी. वाले त्यांना हात लावू द्यायला तयार नाहीत आणि ते लोक मावशी, किंवा मामा म्हणजेच नेणारे लोकं यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत पेशंटची काय हालत होत असेल याची कल्पना करणे अशक्य. ह्या विषयाकडे डीन ने किंवा आस्थापनेने लक्ष दिले नाही तर येणारा उद्या सामान्य लोकांसाठी ठाणा सिव्हिल हॉस्पिटल या नात्याने खूप वाईट ठरणार आहे.

हवालदील झालेल्या पेशंट लोकांच्या सोबत आलेल्या नाते वाईकांना मात्र चोरा सारखे शांत बसावे लागते. स्थानिक यंत्रणेने लक्ष न दिल्यास भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटना या नात्याने मुंबई प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता, आस्थापने विरुद्ध विशेष पाऊल उचलण्यात येईल असे प्रतिपादन विशाल वाघ ह्यांनी जाहीर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.