‘मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा ९ मे रोजी समारोप

0

जळगाव | जळगावातील शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात ‘मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते ७ मे रोजी उत्साहात झाले. तब्बल १६० जातींच्या आंब्यांची मांडणी असलेल्या या प्रदर्शनास नागरीकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्शन नागरिकांसाठी आज देखील सकाळी ९ वाजेपासून खुले असणार आहे, त्याचा समारोप ९ मे रोजी सायंकाळी होईल.

आंब्यांच्या विविधतेचा अनोखा अनुभव देणारे हे प्रदर्शन जळगावकरांसाठी औत्सुक्याचे ठरले आहे. आंबा संशोधनातील जैन इरिगेशनचे योगदान अधोरेखित करणारे हे प्रदर्शन सर्वसामान्यांना परिचय करून देते. स्थानिक तसेच विदेशी आंब्यांच्या दुर्मीळ जाती एकाच छताखाली पाहण्याची संधी नागरिकांना मिळाल्यामुळे आंब्याविषयी अधिकची माहिती भेट देणाऱ्यांना मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.