बेस्टच्या २९३ क्रमांक बस सेवेचा पुन्हा शुभारंभ; बोरीवली येथे दिला शिवसेनेने प्रवाशांना दिलासा

0

मुंबई | हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१२ नगरसेविका सौ सारिका शशिकांत झोरे यांच्या प्रयत्नाने जय महाराष्ट्र नगर, मागाठाणे बस क्र.२९३ या बस सेवेचा नव्याने शुभारंभ करण्यात आला. माजी आमदार श्री विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभागसंघटक सौ शुभदा शिंदे व आगार व्यवस्थापक जितेंद्र सामंत यांच्या शुभहस्ते या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी मागाठाणे विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर, महिला विधानसभाप्रमुख रेखा बोऱ्हाडे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य, मागाठाणे विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, उपविभागप्रमुख चेतन कदम, माजी नगरसेवक सुनिल चव्हाण, विधानसभासंघटक मिलिंद साटम, विधानसभा संघटक सौ रोहिणी चौगुले, विधानसभा समन्वयक वैभवी तावडे, शाखाप्रमुख अभिलाष कोंडविलकर, महिला शाखासंघटक सौ वनिता दळवी, सौ माधुरी खानविलकर, शाखा समन्वयक संजय जोजन, उपशाखाप्रमुख प्रतिक चव्हाण, जयप्रकाश कोयंडे, अजित वाळंज, सदा परब, स्नेहल भोसले, श्रद्धा सुर्वे, सीमा सानप, विजया गायकवाड व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.