जळगाव तालुक्यातील तरुणाचा पुण्यातील मोशी दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू
जळगाव | पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भावेश मोहन वाणी (वय ३३) असं या मृत तरुणाचं नाव असून या घटनेमुळे शिरसोली गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी भावेश वाणी हे नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास होते. मोशी परिसरात झालेल्या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.


दिवंगत भावेश मोहन वाणी यांच्यावर गुरुवार, दि. ९ जुलै रोजी रात्री १० वाजता पुण्यातील रुपीनगर स्मशानभूमी, निगडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
भावेश वाणी यांच्या अकाली निधनामुळे शिरसोली परिसरात शोक व्यक्त करण्यात येत असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती नागरिकांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.