धामणगाव येथे जागतिक हिवताप दिन साजरा

0

धामणगांव ता. जळगाव :- प्रा. आ. केंद्र धामणगांव येथे आज २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येवून जनजागृती करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे व ता. आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे याचे मार्गदर्शनाखाली प्रा. आ. केंद्र धामणगांव येथे जागतिक हिवताप दिना निमित्त उपस्थित नागरिकांना वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ व डॉ. धनश्री सराग यांनी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

हिवताप व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना, व घ्यावयाची काळजी या बाबत माहिती दिली. हिवताप व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाबरोबर जनतेचा सहभाग असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकत नाही. असेही यावेळी डॉ. सराग म्हणाले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ ता. हिवताप पर्यवेक्षक श्री चंद्रशेखर महाजन , आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, प्रकाश गडरी यांनी गावात जाऊन पाण्याचे कंटेनर, डास उत्पत्ती स्थाने, याची पाहणी केली व गट सभा घेण्यात आल्या.
हिवताप किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला कोरडा दिवस पाळावा, दैनंदिन पाण्याच्या वापराकरिता घरामधील व घराबाहेरील टाकी आठवड्यातून एक वेळेस पूर्णपणे रिकामी व घासून-पुसून स्वच्छ करून पुन्हा भरून झाकून ठेवावी, इमारतीच्या गच्चीवर व परिसरात टायर, नारळाच्या करवंट्या व इतर पाणी सासेल अशा टाकाऊ वस्तू ठेवू नयेत. त्यांची विल्हेवाट लावावी. गावालगतच्या नाल्या मधील पाण्यात गप्पी मासे सोडावे इ. बाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. राहुल बनसोडे, डॉ. वृषाली पवार, मयुरी शिरसाट, ता. हिवताप पर्यवेक्षक चंद्रशेखर महाजन, ता. आरोग्य पर्यवेक्षक मोहन टेमकर, आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, प्रकाश गढरी,आरोग्य सेवक घनश्याम लोखंडे, सतीश अजलसोडे , विजय मराठे, प्रियंका मंडावरे, जयश्री कंखरे, संगीता कोळी, एन. जे. बागरे, सुनिता पाटील, सुवर्णा नाव्ही, दिपाली सोनवणे, हर्षल चावरे , संगीता घेर, व आशा सेविका आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.